काय सांगू मी, या मधुमेहाची महती
तो मानवी शरीरात, करतोय गमती
रक्तात कोणाच्या, साखरकण जमती
मूत्रात कोणाच्या साखरकण दिसती
मधुमेह तसा रोग, असे फार लाघवी
शरीराशी, कायमचे नाते तो दाखवी
वजन मनुष्याचे, रोग सदा हो घटवी
नियम खाण्याचे, मनुजा तो शिकवी
वाढताच याचा, असा हा प्रादुर्भाव
डोळ्यांत येतसे, काकुळतीचा भाव
रस्त्यात येतसे, भोवळ कधीही राव
पोटात उठली असते, हो कावकाव
पायाच्या रक्तवाहिन्या,होती हो अरुंद
रक्तपुरवठा होत नसे,हो त्याना बुलंद
जखम झाली तरी, पायाना नसे गंध
मग शस्त्र्क्रिया करण्यास, नसे निर्बंध
वाढताच तुमच्या रक्तातील कोलॅस्ट्रोल
रक्तवाहिनीत अडथळा, जातसे तोल
हृदयास होत नसे रक्तपुरवठा समतोल
हृदयविकाराची, भीती असे चिरकाल
काळजी घेण्यास, आपुल्या हो पायांची
मैत्री करावी सुतीमोजे,कापडी बुटाची
निगा राखावी नाजुक अशा पावलांची
ठेऊन स्वच्छ व कोरडी त्वचा तयांची
नियंत्रण ठेवण्या आपुल्या हो शरीरावर
नियमित चालावे रोज, ते तीन मैलावर
आहार न घ्यावा, आपण तो पोटभर
तुटून न पडावे गोड, मधुर पदार्थावर
आहार करावा थोडा, आपण चार वेळ
वर्ज्य करावा बटाटा,भात,हो सर्वकाळ
शेंगभाजी, पालेभाजी,खावी दोन्हीवेळ
पेढे,आईस्क्रिम याची करावी टाळाटाळ
रक्ताची करावी तपासणी,आपण वेळोवेळ
निद्रा,जेवण यांची ठरवावी,कायमची वेळ
औषधाची चुकवू नये, कधीही आपण वेळ
वाढेल आयुष्य आपुले,ते आनंदी सर्वकाळ