पाऊस कळण्यासाठी

पावसाच्या आठवणीत .... निबंधाच्या निमित्ताने..


 


पाऊस कळण्यासाठी
थेंब प्यावा लागतो
गाण्यासंगे गळ्यात
रुजून यावा लागतो


पाऊस कळण्यासाठी
उनाड वारा व्हावं
धरणीसंगे मखमालीचा
हिरवा पाचू ल्यावं


पाऊस कळण्यासाठी
गाणं गाता यावं
हिरवाईच्या गळ्यात
भिजरा सूर व्हावं


पाऊस कळण्यासाठी
चिंब भिजलं पाहिजे
थेंबकोवळ्या नक्षीसंगे
आतून सजलं पाहिजे


पाऊस कळण्यासाठी
मीपण फेकून द्यावं
सरी शिंपण्या दूरदेशी
मेघ होवून जावं !


- अमोल