हृदय आणि त्याच्या नजर सावल्या त्या

ये दिल और उन की निगाहों के सायें


या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद


हृदय आणि त्याच्या नजर सावल्या त्या


हृदय आणि त्याच्या नजर सावल्या त्या ।
मला घेरताती,  बाहू सावल्या त्या ॥ धृ ॥


पहाडांना चंचल किरण स्पर्शताती ।
हवा नदी नदीच्या जला स्पर्शताती ।
इथुन तिथवरी आसक्त सावल्या त्या ॥ १ ॥


बिलगताती वृक्षांना मेघ भारलेले ।
प्रकाश अन् तमाचाही लपंडाव चाले ।
गार गार असती मार्ग सावल्या त्या ॥ २ ॥


हरखती मने ती, मुभा लाभल्याने ।
किती मिळती जुळती निसर्गाशी मने ।
रंग नाहलेल्या प्रेम सावल्या त्या ॥ ३ ॥


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०५०४