अभंग(हंसकृत)

यादगार यांच्या अभंगाला हा प्रतिसाद दिला होता, त्यांच्या सांगण्यावरून तो इथे टाकतो आहे, टुकार वाटल्यास चांगलाच समाचार घ्या.

आजच्या वीजेच्या प्रश्नावर भाष्य केले आहे-

वीज नाही येथे
भिजलो घामात
पुण्या मुंबईत
रोषणाई

नेते थंडगार
रंगवती वाद
नेमती लवाद
दररोज

दाभोळी बांधला
वीजेचा प्रकल्प
कोणता विकल्प
शोधू नये

'हंस' म्हणे माझा
पुरवावा हट्ट
गळफास घट्ट
लावू नये

-नीलहंस.