चंद्रकोर

शुभ्र चांदण्याची  ही सुगंधीत रात्र आहे  
त्या देखण्या चंद्रकोरीची उणीव मात्र आहे 


     जाणतो मी आता आली आहेस इथेच तू 
      ही वेल रातराणीची निमित्त मात्र आहे


डाग म्हणुनी याला हिणवू दे कुणालाही
तो तीळ गालावरचा प्रेमास पात्र आहे


गाऊ तुझ्याविना सांग कसा 'यमन' मी
त्या तीव्र मध्यमेची ऊणीव मात्र आहे.


  अजय