II ती II
ऑफिसमधले काम आटपून
ती स्टेशनवर आली
गर्दीचे धक्के खात
गाडीत चढली.
तिच्या अंगावर
जागोजाग
डोळ्यांचे चावे,
ती मात्र पाळणाघरात ठेवलेल्या
बाळाच्या चिंतेत!
हवे ते स्टेशन आले
तशी ती उतरली
घाईघाईने स्टेशनबाहेर पाडत
तिने प्रथम
भाजी घेतली
ऐनवेळी उपयोगी पडणारा ब्रेड घेतला
नेहमी न परवडणारी रिक्शा टाळून
तिने घरचा रस्ता धरला.
घराच्या अलीकडेच
पाळणाघरातले तिचे मूल
तिने उचलले
मुलाचा डबा,कपडे,खेळ्णी,औषधं
नेहमीच्या पिशवीत कोंबून
ती घरी आली,
बरमुडा घालून बसलेला तिचा नवरा
तिची वाट पाहत होता!
-देवमाणूस.