मनी आठवती सारे
संगोत्सवाचे सोहळे
मिटलेल्या लोचनात
आसवांचे पावसाळे
दिठी तुझी अलगद
भास भासतो रे खरा
कुठे शोधू पापण्यांत
तुझ्या स्पर्शाचा सहारा
तुझे संकेत श्वासांचे
मोरपिसे माझ्या ओठी
दाटे का रे हा हुंदका
नकळत माझ्या कंठी
पार भेदून जाते रे
तूझ्या नजरेची धार
कापणाऱ्या या देहाला
आठवणींचाहि भार..
तूझी आर्जवे संयत
मनीं दाटली रे खंत
कशी अव्हेरू ही प्रित
क्षणभराची संगत.....
क्षितिजाच्या रांगोळीला
साज रेतीच्या दर्पाचा
तूझ्या माझ्या नात्याचा रे
अंत अभूत पर्वाचा........
शीला