फ़क्त एकदाच......
फ़क्त एकदाच तुला मनसोक्त हसताना पाहायचयं
निदान त्यासाठी तरी मला विदुषक बनून तुझ्यासमोर यायचयं
फ़क्त एकदाच तुझ्या मनातलं सारं काही जाणून घ्यायचयं
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवून तासनतास बसायचयं
फ़क्त एकदाच तुझ्या मऊशार केसांतून हळूवार हात फ़िरवायचायं
निदान त्यासाठी तरी एखादा गजरा तुझ्या केसांत घालायचायं
फ़क्त एकदाच तुला माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचयं
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं ऊशिरा यायचयं
फ़क्त एकदाच तुला अनिवार रडताना पाहायचयं
निदान त्यासाठी तरी मला खोटंखोटं मरायचयं......