नवलाई

नवलाई 


स्वरगंगा तर माझ्यापाशी


मुग्ध गीत तव ओठी का?


मनात माझ्या अथांग सागर


गाज तयाची तव हृदयी का?


वसंतातला बहर मन्मनी


भ्रमरासम तव चित्त अधिर का?


वर्षाराणी बरसे मजवरी


अंकुरे तव प्रित मनी का?


प्राशिले चांदणे शरदाचे मी


धुंदी परी तव नयनी का?


शिशिराची शिरशिरी तनुवरी


बहर अबोली तव अधरी का?


ऋतुराजा मज सांग एकदा


ही जादू?किमयागिरी का?.....


शीला.