होते-नव्हते ते मी सगळे गमावले
श्वासहि उसने घेउन जगणे निभावले...
भ्रष्टपणाची चीडच होती मज पूर्वी
हळू-हळू हे हातच माझे सरावले...
विसरू बघतो नकोनकोशा आठवणी
आठवणींनी सदैव मजला सतावले...
बड्या घरांना पोकळ वासे या शहरी
भल्या-भल्यांनी नावच येथे कमावले!..
'अजब' कुणाला जवळ कराया गेलो मी?
खूप उशीरा जाणवले - 'घर दुरावले'!..