अण्णा भाऊ साठेंची जयंती - एक सोहळा

अण्णा भाऊ साठेंची जयंती - एक सोहळा


कालचा दिवसच आगळा वेगळा होता. पावसाची संतत धार चालु होती...


अण्णा भाऊ साठे यांची जयंती. सगळे रस्ते सर्वच पक्षांच्या (राजकीय हो!) शुभेच्छांच्या मोठमोठ्या फ़लकांनी एकदम सजुन गेले होते.


(केवळ मतांसाठी, साठेंच्या जयंतीला शुभेच्छांचे हजारो फ़लक न चुकता न विसरता लावले जातात.


पण लोकमान्यांना बरेचसे राजकीय पक्ष व्यवस्थित विसरून गेले.


कालाय तस्मै नमः!!)  


समस्त उपेक्षीत समाज, (हे लोक स्वतःला उपेक्षीत म्हणुन घेतात म्हणुन हा शब्द वापरलाय. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नाही.) त्या पावसात आणि आनंदात अगदीच 'धुंद'!!! (धुंदी कशाची हे वेगळे सांगण्याची गरज नसावी). सगळ्यांनाच अगदी काय करू नी काय नको झाले होते. तरी देखील ज्याला जे जमेल ते तो करीत होताच!


एका ट्रॉक्टरवर मागे ट्रॉलीमध्ये सांऊंड बॉक्सची मोठी भींत बनवलेली होती. त्यातून शक्य तेवढ्या मोठ्या आवाजात अनेक इंग्रजी गायकांचे अभंग वाजवले जात होते. समस्त उपेक्षीत समाज, त्या ट्रॉक्टरच्या पुढे सागरासारखा पसरला होता आणि "त्या" अभंगांच्या तालावर एकदम अंगात वारे शिरल्यासारखे बेताल झाला होता.


बाकीचा (इतर हिंदु) समाज आपला अंग चोरून कडेने जागा काढत काढत पुढे जायचा यत्न करीत होता. त्यातीलच मी एक!


मी आणि माझे वडील गाडीवरून जात होतो. त्यांना उगाच काय वाटले कुणास ठाउक. मला गाडी एका बाजुला  घ्यायला लावली आणि ते उतरून गर्दीत मिसळले. आता यांना गर्दीत जायची काय गरज पडली म्हणुन मी सुध्दा त्यांच्या मागे मागे वाट काढत त्यांच्या जवळ पोचलो.


बघीतले तर ते दोन  मुलांशी संवाद साधायचा प्रयत्न करीत होते. एक तर गाण्यांच्या मोठ्या आवाजामुळे कोण नक्की काय बोलतेय हेच कळेनासे झाले होते. मग दोघा मुलांना जरा बाजुला घेऊन त्यांच्याशी बोललो.


माझे वडील त्या 'साऊंडच्या भिंतीकडे' हात दाखऊन म्हणाले, "अरे हे काय लावलय तुम्ही, आज अण्णा भाऊ साठेंची जयंती ना. मग त्यांचे साहीत्य लावा की".


ते दोघे, " आमच्याकडे येवढेच साऊंड बॉक्स आहेत."


वडील, "बॉक्स नाही रे. साहीत्य म्हणजे अण्णा भाऊ साठें नी जे लिहीले ते काही तरी लावा. असली इंग्रजी गाणी लावून काय उपयोग?"


तरी त्या दोघांच्या डोक्यात प्रकाश पडेना, ते दोघे, "मग काय लावू?"


वडील, "त्यांचे काही पोवाडे वगैरे असतील तर त्याची कॉसेट लावा. अगदीच काही नाही मिळाले तर आंबेडकरांची, बुध्दा ची गाणी लावा."


हम्म्म, मग कुठे जरा क्लिअर झाले!


लगेच त्यांनी मंडळाचे अध्यक्षांना बोलावले आणि, "हे लोक काय म्हणतात बघा?" म्हणुन पसार.


मग पुन्हा अध्यक्षांना सगळे सांगितले की, "ही इंग्रजी गाणी लावुन असा नाच धिंगाणा घालुन काय उपयोग. त्या पेक्षा अण्णा भाऊ साठेंची, आंबेडकरांची, बुध्दाची गाणी, प्रार्थना लावा."


अध्यक्ष : होय होय बरोबर आहे. पण असल्या कॉसेट कुठे मिळतात?


बहुतेक ह्या काही "खास" प्रकारातल्या कॉसेट असणार आणि सहज मिळत नसणार असा समज असावा अध्यक्षांचा, मी मनात!


वडील : पुण्यात (शहर भागात) जा, कुठल्याही कॉसेटच्या दुकानात मिळतील.
लगेच आठवला म्हणुन "पंकज" या दुकानाचा पत्ता सांगितला .


लगेच अध्यक्षाने नाचणा~या दोन पोरांना पकडले आणि 'त्या' कॉसेट आणल्याशिवाय, परत यायचे नाही म्हणुन पैसे त्यांच्या हातात कोंबले.


आपली सुचना किमान नीट ऐकुण घेतली आणि लगेच त्यासाठी पोरांना कामाला लावले, हे ही नसे थोडके! असे समाधान मानुन आणि अध्यक्षांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देवुन आम्ही दोघे तिथुन निघालो.


कृपया नोंद घ्यावी


- हा लेख केवळ, मला आलेला अनुभव, घडलेला प्रसंग म्हणुन वर्णन केला आहे. इथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नाही.


--सचिन