ओरखडे हे उमट्ले;गणना त्याची नाही
जखमा ही ओल्या;गणना त्याची नाही
निव्वळ टिपणे; समीक्षा त्याची नाही
ओरखडे जखमा नित्य; खंत त्याची नाही
मनाचा सृजन जपणे; पर्याय त्याला नाही
नियतीचे हे असेच असणे; मति भ्रष्ट नाही
वास्तवाशी असेच झटणे; विचार दुसरा नाही
दुखणे खुपणे रोज सहावे; मनी कटुता नाही
पी चंद्रा