आजच का....

आजच का तुझी याद आली
आजच का मन पिसे झाले
आजच का ह्रदयात माझ्या
भावनांचे काहुर माजले?


आजच का चेतना जागल्या
आजच क दर्याही उसळला
आजच का हे मळभ दाटले
आजच का अश्रूही बरसले?


आजच का हे असेच घडले
आजच का ते तसेच घडले
आजच का विचारात मग्न
आठवणीत मी बुडुन गेले...


आठवणीच्या नादात तुझे
मखमली स्वर गुरफटले गेले
रोजच्याच प्रश्नांतून नेमके
आजच का हे गीत उमटले?


आजच का अंधार जाहला
आत कसला विस्तव पेटला
आजच का शब्दांच्या निखाऱ्यांतून
रोम रोम पेटुन उठला!


 


ही कविता अजुनही अपूर्ण आहे. आपणांस काही सुचल्यास नक्की सांगावे.


 मधुरा