तरंग ..

काही दिवस असेच जातात
फारसं काही घडत नाही
खरं म्हणजे त्यानं
तसं फारसं काही बिघडत नाही

भावनांचा कल्लोळ नाही
विचाराचं मोहोळ नाही
डोक्यात कसला म्हणजे
कसलाच घोळ नाही

ईतकी शांतता की मी
चाचपुन बघते
माझंच अस्तित्व पुन्हा पुन्हा ...
माझ्या जिवन्तपणाच्या
त्या जुन्या खुणा ..

मला जाणवते .....
शांत संथ प्रवाहावर
मंदपणे डोलणारी एक नाव ........
तोपर्यंतच ...
जोपर्यन्त उरातला तरंग, घेत नाही त्या ...
शान्त डोहाचा ठाव.

काही दिवस असेच जातात
फारसं काही घडत नाही
खरं म्हणजे त्यानं
तसं काहीच बिघडत नाही