मनासारखे देवा आता दान दे
आयुष्याला अर्थाचे परिमाण दे
हातावरती नसोत रेषा असोत रेषा
नशीब माझे लिहायचे सामान दे
किती वेदना सोसायाच्या लाजिरवाण्या?
शेवट आला आता तरी सन्मान दे
नीरस वाटे चाकोरीचा रुळला चकवा
नवीन वाटा घडवायाचे आव्हान दे
तुझाच केला धावा गेली कितीक वर्षे
जगन्नियंत्या आम्हा तुझे पतित्राण दे
दिलास सागर, दिलेस खारे पाणी
सागराला आता थोडी तहान दे
संपदा