अंधारल्या घरात
तुळशीवृंदावनाच्या
पणतीच्या ज्योतीचा
हळुवार किरण होऊन
उजळून टाकलीस
माझ्या भैरवीची उदास मैफ़िल..........!
हळुहळु फ़ुलत जाणारा हा प्रत्येक क्षण
जपुन ठेवीन मी
काळजाच्या सांदिकोपऱ्यात
मिलनाचा साक्षिदार म्हणून................!
तुझ्या आश्वासक प्रेमानं
प्रफ़ुल्लीत होऊन
माझे श्वास गाऊ लागलेत
मेघमल्हार
आणि
डोळ्यांची पाखरं थरथरू लागलीहेत
तुझ्या उनस्पर्शी मायेनं......!
कसं रे हे गारूड घातलस
या अशा कातरवेळी.....?
कुठे शोधू मी मलाच...................?
शीला