थांग

या खार्‍या पाण्याचा थांग लागणं
अशक्यच आहे.. कुणालाच..
केवळ माझ्या कवेत आहे
म्हणून माझं म्हणता येईल का?
कोण जाणे..
उमाळे खोटे नाहीत त्याचे.. पण..
लाटेलाटेने येऊन जितकं भिजवेल
तितकेच आम्ही एकमेकांचे..
बाकी..
त्याच्या पोटातली खळबळ त्याच्याकडे
आणि शिंपल्यांत जपलेल्या आठवणीच तेवढ्या माझ्याकडे..