नाचलो मी यार तेव्हा


परजुनी शब्द शब्द मी होतो तयार जेव्हा
हासली जरा अन, झालो मीच ठार तेव्हा


अंगांग तापलेले, आली समोर जेव्हा
अवचित स्पर्श होता पडलो मी गार तेव्हा


उरात मोगरयाचा भरला सुगंध जेव्हा
घेताच श्वास एक झिंगलो मी फ़ार तेव्हा


स्वप्नातली परी ती आली कुशीत जेव्हा
काढले स्वतःला मी चिमटे हजार तेव्हा


नुकतीच पहिलेली स्वप्ने अनेक जेव्हा
मानुन स्वप्न सत्य नाचलो मी यार तेव्हा

अंगणात दिसली भलत्याच ती रे जेव्हा
मी एकटाची जगलो मानुन हार तेव्हा


मन्नु