अलिकडेच दोन घटना घडल्या. एकात संसदेवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला फाशी द्यावे की नाही असा वाद निर्माण केला गेला आहे. आणि त्याच वेळी सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यपाल या नात्याने एका आरोपीला दिलेली शिक्षेतील सूट न्यायालयाने रद्द केली आहे. या पार्श्वभूमीवर फाशीची शिक्षा असावी का आणि राज्यपाल/राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराच्या वापराविषयी आपण चर्चा करू या. मागील संदर्भ तपासताना मला चित्त यांचा दि.७/७/२००५ चा प्रतिसाद सापडला. त्याचाही विचार करता येईल. युरोपियनांचा फाशी-विरोध मलातरी पटणारा नाही.
अवधूत.