प्रेम हे माझे तुझे

प्रेम हे माझे तुझे जुळलेच नाही
खेळ दैवाचे कुणा कळलेच नही

पाहिले रस्ते सुखाचे केवढे मी
पाय त्या वाटेवरी वळलेच नाही

झेलले छातीवरी मी वार सरे
वार पाठीवर कधी टळलेच नाही

मी कसे लपवून ठेवू दु:ख माझे
हुंद्क्यांना मी  इथे गिळलेच नाही

मी तुझ्या प्रेमात या भिजलो असा की
प्रेत ही माझे कधी जळलेच नाही

तोडल्या त्यांनी कळ्या माझ्या सुगंधी
मग फुलांचे गंध दरवळलेच नाही
--------------दर्शन शहा