इच्युका - मोआमा चा कुंभ मेळा?
कॉन्फेस्ट
(मराठी मध्ये पहील्यांदाच बहुदा!)
आणि मग एक धुळीचा रस्ता मुख्य रस्त्या पासुन आत वळला होता. आता पर्यंत आम्ही गाडीत बसुन तसे कंटाळ्लोच होतो. शिवाय चुकलो आहोत की बरोबर हे विचारयला रस्त्यावर कोणीच नाही. अनु पण कंटाळून गेली होती. छोटी गार्गी बराच काळ जागी होती तिने झोपही काढ्ली पण आता ती पण कुर्कूरत होती. आम्ही इच्युका - मोआमा या जोड गावा जवळ असलेल्या 'कॉनफेस्ट' या उत्सवा साठी चाललो होतो. आणी जवळ म्हणजे १०० किमी! इकडे गाव १०० किमी रहिलेले आणि पुढ्चे गाव फ़क्त २५०किमी. त्यात संध्याकाळ व्हायला लागलेली. तेव्ढ्यात मला हा धुळी चा रस्ता दिसला. समोर खूपसे कपडे पताका लावल्या सारखे लावले होते. त्यामुळे रस्ता पट्कन दिसला. आत वळल्या वर कळले की अजुन पण बरेच लोक आहेत. त्या कपड्यांखाली मोठ्या अक्शरात लिहीले होते 'Welcome to Confest - Cloths optional' आणि आम्ही एकमेकांच्या कडे पहिलं आणि त्या कार्स च्या रांगेत सामील झालो. मुख्य रस्त्या पासून उत्सवा ची जागा - कँम्प साइट, चांगली ५-६ किमी दूर होती. पण सगळे लोक मजेत आणि हसत खेळत दिसत होते. टॉम या माझ्या मित्राच्या सांगण्या वरुन आम्ही येथे आलो होतो. तो तर आधीच आला होता. आणि आमच्या साठी तंबू पण ठोकून ठेवणार होता. पण या संध्याकाळ च्या वातावरणात त्याला कुठे शोधणार आम्ही? त्यात गार्गी फक्त सहा महिन्यांची! मला त्या रांगेत असतांना जरा काळजीच वाटायला लागली. गेट वर पोहोचलो. स्वयंसेवकाने एकशेवीस डॉलर्स ची पावती दिली आणि आम्ही पुढे निघालो.
तोवर चांगलाच अंधार पडला. गाडी चे हेड लाईट्स लावुन चालवण्या इतका.
दुपारी इच्युका - मोआमा ला खाल्लेला पिझा पचून कावळे कोकलायला लागले होते. उत्सवाच्या ठिकाणी, लोकांनी, जागा शोधुन तंबू लावलेही होते.
तेवढ्यात जोरदार पावसाला सुरवात झाली! इतका जोरात की मला त्या कच्च्या र्स्त्यावरचे काहीच दिसेना! मग अंदाजाने गाडी पुढे नेत राहीलो. चाकं घसरत होते. प्रत्येक वळणाला गाडी वेडीवाकडी होत होती. मग झाडी खूपच गर्द झाली. तंबू पण जवळ - जवळ यायला लागले. पाउस जरा कमी झाला. लोक पण दिसायला लागले. मी काच खाली केली आणि एका माणसाला हात केला. तो जवळ आला, त्याला विचारले की
'आर देयर मोअर टेंट्स फ़र्दर?'
ऒ येस माइट देयर आर मोर... आर यु न्यु?
मी म्हणालो 'येस वुइ आर न्यु... इट इज अवर फर्स्ट टाइम'
तो म्हणाला 'ऒ वेलकम वेलकम टु कॉनफेस्ट...'
आणि चालायला लागला...
मी हळूहळू गाडी परत सूरु करुन टॉम ला शोधायला लागलो.
---
आणि मग अंधार चांगलाच पडला! मला पण कळेना की टोम ला आता कसे शोधायचे. तंबू जवळ जवळ असायला लागले. हळूहळू गाडी चालवतांना अचानक दोन्ही हात वर करुन
टॉम समोर आला. हुश्श झाले!
टॉम ने छान तंबू लावुन ठेवला होता. पावसाळी हवा असल्याने आम्हाला त्याने तंबू मध्ये अजुन एक तंबू लावून दिला. वारा कमी झाला, पण थंडी मी म्हणत होती. जरा गाडीतुन बाहेर पड्ल्याने मोकळे, बरे वाटत होते. अनु, सुझी, टॉम ची पत्नी, बरोबर गप्पा मारत होती. खुप भुक लागली होती.
टॉम ने एक घडीचा गॅस बर्नर आणुन लावून ठेवला होता. त्यावर पट्कन अंडी फोडुन घातली. मस्त आम्लेट बनवुन त्यावर ताव मारला. शिवाय भात पण लावला. म्हणजे रात्री ची जेवणाची काळजी नको. मग मी गार्गी ला घेउन एक चक्कर मारायला निघालो. लोक मजेत इकडे तिकडे फ़िरत होते.ठिक ठिकाणी बार्बेक्यु पेटले होते.
लोक खमंग चिकन भाजत होते, शिवाय करीची तयारी पण दिसत होती. हलका सा धूर आसमंतात पसरला होता.
येणारे जाणारे हॅलो आणि 'नमस्ते' म्हणत होते. बरेच लोक माळा घालून वगैरे दिसत होते.
ढोल वाजवल्या चा आवज येत होता. मला जरा उत्सुकता वाटली... आवाजाच्या रोखाने गेल्यावर दिसले की काही लोक एकत्र जमून ढोल वाजवत बसले आहेत. तिथे एक कापडी फलक पण होता 'Confest - No strangers only friends' मला सगळे वातवरण एकदम आवडून गेले. त्या धूर भरल्या गार हवेत मी कोणत्या तरी वेगळ्याच दुनियेत पोहोचलो आहे हे मला जाणवू लागले.
---
आणि मग थोड्या वेळाने जरा फिरुन परत आलो. गार्गी पण जरा कुरकुर करत होती. ढोल वाजणे चाललेच होते. थोडेफार खाउन जरा पडु या असा विचार केला. तंबू मधली ती झोप; काय लागणार? त्यात आम्ही तिघे येवढ्याश्या जागेत!
सकाळ झाली. सुंदर दिवस उघडला होता - सोनेरी छानसे उन. तंबू मधुन बाहेर आलो. आणि बघतच राहीलो - सुरेख जागा. टॉम ने अप्रतिम जागी आणले होते. छानशी नदी - जवळूनच संथपणे वहाणारी!
इतक्यात टॉम त्याचे ध्यान संपवुन आलाच. "हाऊ आर यु निनाद?"
मी म्हणालो "एक्स्लंट! धिस इज ग्रेट प्लेस"
"ओ येस, दॅट्स व्हाय आय वाँटेड यु टु कम. नाउ गेट रेडी अँड वी विल गो टु द मेन प्लेस"
"ऍंड व्हॉट डु वी डु देर? " मी विचारले.
"यु गाइज वील लाईक इट - इट इज फुल विथ सो मेनी थिंग्ज. यु कॅन चूज ऍंड गो देर"
जरा आवरुन आम्ही पण गार्गी ला बाबागाडीत घालून निघालो. इतरही लोक निघालेच होते. काही लोक आरामात उन्हात पसरले होते. काही जण झाडांखाली विसावले होते. ठिकठीकाणी ब्रेकफ़ास्ट चालले होते.
एकुण सगळी मंडळी आरामात दिसत होती. थोडे चालून आम्ही पुढे आलो. तिथे बरेचसे कार्यक्रम असावेत असे दिसत होते. एक फलक होता, स्टीम बाथ, आणि त्याखाली एक बाण.
जरा पुढे गेलो तर अनेक मंडळी बीना कपड्यांचेच! नदी ला छान वाळू होती आणि एका ठिकाणी मस्त गरम पण्याचा छोटासा शॉवर. शिवाय मड बाथ साठी एक चिखलाचे पाँड सुद्धा! नागडी मुले, माणसे आणि बायका सगळे मजेत खेळत होते. या भागात कुणाच्याच अंगावर कपडे नसल्याने मला चक्क आपल्या कपड्यांचीच लाज वाटायला लागली.
पुढे एका फलकावर आजचे कार्यक्रम लिहीलेले होते. त्यात ध्यान कसे करावे, मालिश चे प्रकार, (यात चंपी मलिश पण होते!), नाच कस करावा, योगासने, हटयोग, कुकींग विथ स्पायसेस, भजन, यांचे वर्ग!
मला वाटत होते की मी, भारतातच कुंभ मेळ्याला आलो आहे.
पुढे तर एका ठिकाणी चक्क पैकी हरे रामाचे भजन! ढोलकी आणि तंबोरा या सह!
क्रमशः
http://asazale.blogspot.com या ब्लॉग वरही प्रकाशित केले आहे.
असे दोनही ठिकाणी प्रकाशित करणे योग्या आहे कि नाही हे महीत नाही पण केले खरे!