प्रस्थापितानं प्रमाणे..

प्रस्थापितानं प्रमाणे आता जगेन म्हणतो
सोडून लाज सारी आत्मा विकेन म्हणतो

पाहून इथे स्वप्ने झाले भले कुणाचे
स्वप्नील आज माझे डोळे विकेन म्हणतो

साऱ्याच वेदनांचा आता सराव झाला
हसून आज थोडे अश्रू विकेन म्हणतो

बाजार भावनांचा इथे भरात आला
सोडून सूर आता गाणे विकेन म्हणतो


                               आनिरुद्ध अभ्यंकर