पालखी

स्वप्नांचा येईल पाऊस
नको जाऊस
जराशी थांब
मृदगंधीत ओले
मनास फुटतील कोंब


फुलेल पुन्हा प्राजक्त
तुझ्या दारात
असा दवार
डोळ्यांच्या परडीत तेव्हा
वेच स्वप्ने हळुवार

विजनात विरून जाईल
अशी ना राहिलं
रात्र काळोखी
येईल पहाट घेऊन
पुन्हा स्वप्नांची पालखी