झाड

एका बागेत एक झाड वाढत होत
ते फुलांनी सावलीने हासत  होत
भुंगे आले, पाखरे आली, तेथे रमली
बागडली, भांडली, तरी राहिली

वादळाने त्या झाडाच्या मोडल्या फांद्या
तशा वाळल्या त्याच्या छोट्या सावल्या
अनेक छोटी झाडे आजुबाजुला वाढली
चला चला करत  गर्दी थोडी पांगली

शुकशुकाटात अजूनही  काही पाखरे
एकमेकांसाठी त्याच झाडावर थांबली
त्यांना बघून झाड चैतन्याने सळसळल
माळ्याच्या कष्टाला नव फळ मिळाल

दूर झाडावर एक कावळा कोकलला
घरटे तोडण्याचा  माझा प्रयत्न फसला!