सुपर एट होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा वर्ल्डकपच्या या थांबवा गजाली
आम्ही दोन विजयांचीही आस का धरावी? फ़क्त बर्म्युडाला चोपुन हुषारी करावी
कशी ग्रेग मास्तरची ही पोरे ढ निघाली अरे पुन्हा........
उभा देश रात्रीतुन या आडवाच झाला ढिला स्क्रू मिळेना पाना टीम इंडियाला
अशी कशी गाडी यांना खटारा मिळाली अरे पुन्हा.........
जाहिरात करण्यासाठी म्यान सर्व बॅटी निघा पेन्शनीत तुम्ही अन वळा बसुन वाती
तुम्ही ती दुकाने ज्यांना गिऱ्हाइक न वाली अरे पुन्हा......
धुमसतात अजुनी शौकिन दाणे खात खारे अजुन स्वस्त शर्टावरुनी पळाले सितारे
गाढवेच बिन तंत्राची अम्हाला मिळाली अरे पुन्हा...
प्रमोद बेजकर