नव वसंत हा भूवरी नव पल्लव नव वल्लरी रंगांची उधळण न्यारी किरमिजी कुठे सोनेरी
हे रोम नवतीचे उठती तरूतरूच्या अंगांवरती मनी अधीरता दाटली कशी दिसेल नवपालवी
प्रसूतीचे हे डोहाळे सृष्टी आनंदे हिंदोळे उल्हास नवनिर्मितीचा उपहार वसंताचा!
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.