उपहार वसंताचा

नव वसंत हा भूवरी
नव पल्लव नव वल्लरी
रंगांची उधळण न्यारी
किरमिजी कुठे सोनेरी

हे रोम नवतीचे उठती
तरूतरूच्या अंगांवरती
मनी अधीरता दाटली
कशी दिसेल नवपालवी

प्रसूतीचे हे डोहाळे
सृष्टी आनंदे हिंदोळे
उल्हास नवनिर्मितीचा
उपहार वसंताचा!