दिसायाला बरी होती

दिसायाला बरी होती
(हवाईसुंदरी होती)१,२

नजर की शस्त्र भेदक ते?
कशी मारेकरी होती

कशाला प्यायची दारू?
सखी हरहुन्नरी होती१,२

विमानी यक्ष मी झालो
समोरी किन्नरी होती

क्षणाची मौज जी माझी
तिची ती नोकरी होती

- माफी

हे शेर शृंगारिक आहेत
हे शेर विनोदी आहेत
हे शेर गंभीर आहेत