दाटला गगनी ढगांचा पिंगा
दुपारी घातला निशेचा पडदा
आनंदे उजळी मनाचा गाभारा
पाऊस तरूवरी रमणीय ओघळला
तुषार टपोरे घनघोर नाचले
तलम चालले मदहोश तराणे
रंगात गळाल्या संकोचाच्या कुबड्या
पाऊस तरूवरी रमणीय ओघळला
भावनांच्या मिलनाची चालली बहार
नाहीच कळली जाहली कधी सांजवेळ
ग्रीष्माचा निरोप घेतला श्वास मोकळा
पाऊस तरूवरी रमणीय ओघळला
(शैलेश श. खांडेकर)