अजून-२

आमची प्रेरणा विसुनाना यांची कविता अजून

अजून कळेना कशास होतो घुसलो तव कक्षी
अजून आठवे गालावरची तुझ्या हाताची नक्षी

अजून स्वप्नामध्ये दिसती तुझ्या पायीच्या बाटा
अजून सुद्धा टाळून जातो तुझ्या घराच्या वाटा

अजून जेव्हा वार्‍यावरती तुझाच दरवळ येतो
अजून घराची दारे खिडक्या मी लावून घेतो

अजून लागतो अधार मजला रोज इथे कुबड्यांचा
अजून घेतो आहे मी बघ शोध इथे दातांचा