रानटी कोणी म्हणो

'रानटी' कोणी म्हणो, राहो म्हणत, "हा वन्य आहे!"
प्रेमवादळ घेरता, मज मार्ग कुठला अन्य आहे?

हो! हृदय आहे मला, आहेत आकांक्षा मलाही
अश्म मज समजू नका हो, शेवटी माणूस मीही
तोच माझा मार्ग आहे, जो जगी जनमान्य आहे
प्रेमवादळ घेरता, मज मार्ग कुठला अन्य आहे?

थंड श्वासांतून कळते केवढी ही आग लागे!
दचकुनी झोपेतुनी आयुष्य झाले आज जागे
वाटते, आता नभासम मी अथांग अगण्य आहे
प्रेमवादळ घेरता, मज मार्ग कुठला अन्य आहे?

गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा  अशा पद्धतीने गा !

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )