तू जिथे जिथे विहरशील

तू जिथे जिथे विहरशील

तू जिथे जिथे विहरशील, माझी छाया साथ देईल || धृ ||

कधी माझी सय येऊन, जे ढळतील तुझे अश्रू |
तिथे येऊन रोखतील त्या, पुढे होऊन माझे अश्रू |
तू दिशेने ज्याही जाशील, माझी छाया साथ देईल || १ ||

तू उदास होशी कधी जर, तर उदास मीही होईन |
मी दिसो तुला, दिसो ना, तरी जवळी तुझ्याच राहीन |
तू कुठेही जात असशील, माझी छाया साथ देईल || २ ||

मी दुरावले कधी जर, माझे दुःख करू नको तू |
माझे प्रेम आठवूनी, नको डोळे ओले करू तू |
तू पाहसी जर वळूनी, माझी छाया साथ देईल || ३ ||

माझे दुःख नेहमी सोबत, तुझ्या दुःखी, तुझ्या शोकी |
माझे प्रेम येते सोबत, हर जन्मी साथ होऊन  |
कुठलाही जन्म घे तू, माझी छाया साथ देईल || ४ ||

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०५३१

मूळ हिंदी गीत, गीतकार, संगीतकार, गायीका, चित्रपट, भूमिका आणि साल ओळखा!