मराठी सिनेसंगीतात वेगळेपण

खरं तर मी ए.आर. रहमान चा चाह्ता ! अगदी त्याची तामीळ, तेलुगु गाणी देखील ऐक्णारा (खरे तर त्या भाषांमध्येच त्याने त्याचे खरे कौशल्य दाखवलय, हिंदित त्यचे १०% हि आलेले नाही) ह्यांची जी काय style आहे तीची आठ्वण आली, मराठीत "अगं बाई अरेचा" ची अजय अतूल यांची गाणी ऐकल्यावर, मराठीतल्या इतर संगीतकारांपेक्षा वेगळा साऊंड आणी टेक्नो म्युझिक चा उत्कृष्ट संगम सर्व काही रहमान सारखं पण मराठीपण जपणारं, त्यांची इतर गाणी ही ऐकली विश्वविनायक, जत्रा, अल्फा गौरव शीर्षक गीत, हनुमान चालीसा यात तर त्यांचे वेगळेपण अजुनच कळुन आले. पण का कुणास ठाउक मिडियाने त्यांची हवी तशी दखल घेतली नाही असे मला  वाटते. त्यांची संगीतक्षेत्रातली कामगिरी अशीच उंचावत राहो. मराठीत काहीतरी वेगळे ऐकायला मिळो हीच सदिच्छा.