बोलताना तोल गेला
बोलताना तोल गेला;
घाव झाला, खोल गेला.
कालचा उपदेश माझा,
काय मित्रा, फोल गेला?
पैंजणांना चेतवाया,
ढोलकीचा बोल गेला
अश्रू सांगे वाहताना,
-"जन्म कवडीमोल गेला".
नेत्र-बाणा, सांग ना रे!
एव्हढा का खोल गेला?
वाढला अंकुर पण का,
सोडुनी ती ओल गेला?
काय रामाच्या कथेतुन,
जानकीचा रोल गेला?
-मानस६