सर्वप्रथम मराठी व्यक्तिविशेष

आज मटात हा लेख वाचायला मिळाला. सर्वप्रथम मराठी व्यक्तींच्या उल्लेखांचे सुंदर संकलन वाटले. सर्वांना त्यात भर घालता यावी ह्या उद्देशाने तो येथे उतरवला आहे.

म.टा. तला मूळ लेख : महाराष्ट्राची 'फर्स्ट'ची परंपरा कायम!
रविवार, २२ जुलै २००७
 
म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रपती पदावर निवड झालेली पहिली महिला म्हणून विराजमान होताना प्रतिभा पाटील यांनी भारताच्या इतिहासात 'र्फस्ट' ठरण्याच्या महाराष्ट्राच्या परंपरेवर नव्याने शिक्कामोर्तब केले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात जन्म झालेल्या पाटील यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह केला, तसेच त्यांची बहुतांश राजकीय कारकीर्द महाराष्ट्रातच फुलली. आमदार, मंत्री, खासदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रमुख अशी अनेक पदे त्यांनी दिल्ली व जयपूरला जाण्यापूवीर् भूषवली.

राष्ट्रपतीपदी बसणाऱ्या त्या 'र्फस्ट' मराठी व 'र्फस्ट' महिला असल्या तरी, 'र्फस्ट' हे विशेषण मागे लागणाऱ्या त्या एकमेव मराठी व्यक्ती नाहीत. १९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेचे 'र्फस्ट' अध्यक्ष अहमदाबादमधून (तत्कालिन मुंबई प्रांतात असलेले) निवडून आलेले ज्येष्ठ संसदपटू जी. व्ही. मालवणकर हे होते. नि:पक्षपाती भूमिका आणि कणखर मनाचे अशी ख्याती कमावलेल्या मालवणकरांनी वेळप्रसंगी नेहरूंसह अन्य सदस्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती.

घटनासमितीचे अध्यक्ष असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंदीय मंत्रिमंडळातील 'र्फस्ट' कायदा मंत्री झाले. घटना प्रभावीपणे लागू करण्यासाठी त्यांनी अनेक विधेयके त्यावेळी सादर केली. तर बी. व्ही. केसकर हे भारताचे 'र्फस्ट' माहिती व प्रसारण मंत्री होते. त्यांनी स्वतंत्र भारतात 'ऑल इंडिया रेडियो'ची संकल्पना रुजवली. दिल्लीमध्ये १९५९ साली ज्यावेळी दूरदर्शन स्थापन करण्यात आले, त्यावेळी 'र्फस्ट' निर्माता बनण्याचा मानही पु. ल. देशपांडे यांनी पटकावला.

महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही 'र्फस्ट' सत्याग्रही म्हणून त्यांनी सवोर्दयी नेते आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले.

राजकारणाच्या व्यतिरिक्तही अन्य क्षेत्रांतही अनेक मराठीजनांनी 'र्फस्ट'चा मुकूट आपल्या शिरपेचात खोवला आहे. साने गुरुजींच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर बेतलेल्या आचार्य अत्र्यांच्या श्यामची आई या चित्रपटाला 'र्फस्ट' राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

ही यादी इथे संपत नाही, क्रिकेटच्या मैदानात मराठी क्रिकेटपटू नेहमीच फ्रंट फूटवर राहिले आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजीचा आदर्श असलेला सुनील गावस्कर हा कसोटीमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा आणि डॉन ब्रॅडमनचा २८ शतकांचा विक्रम मोडणारा 'र्फस्ट' बॅट्समन ठरला. तर गावस्करांना मागे टाकत कसोटीमध्ये ३५ शतके ठोकणारा सचिन तेंडुलकर एक दिवसीय सामन्यांमध्ये १५ हजारांचा पल्ला गाठणारा 'र्फस्ट' बॅट्समन आहे. लॉर्ड्सवर तीन शतके ठोकणारा 'र्फस्ट अँड ओन्ली'चा मान पटकावणारा भारताचा माजी कप्तान दिलीप वेंगसरकर मराठीच. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला त्यांच्या मातीत प्रथमच हरवणाऱ्या 'र्फस्ट' भारतीय टीमचा कप्तान अजित वाडेकर हे ही मराठीच.

अनेक विक्रम नावावर असलेल्या लता मंगेशकर फ्रेंच सरकारचा 'नाइट ऑफ लीजन ऑफ ऑनर' हा सवोर्च्च किताब पटकावणाऱ्या 'र्फस्ट' भारतीय. १९१३ साली पहिला चित्रपट आला 'राजा हरीश्चंद'. या 'र्फस्ट' चित्रपटाचे कतेर् होते दादासाहेब फाळके. तर १९५२मध्ये ऑलिंपिकमधील 'र्फस्ट' वैयक्तिक मेडल पटकावणारे खाशाबा जाधवही याच मराठी मातीतले. थोडक्यात सांगायचे तर 'र्फस्ट' राहण्याची महाराष्ट्राची परंपरा प्रतिभा पाटील यांच्या माध्यमातून सुरूच आहे.