कविता

माझी कविता
मीच वाचतो
आनंदाने
मीच नाचतो...

दु:ख मनाला
जेव्हा सलते
कविता माझी
तेव्हा खुलते...

तुझ्याचसाठी
कविता जुळते
न सांगताही
तुलाच कळते...