कधी स्तुतीच्या माथ्यावरती

कधी स्तुतीच्या माथ्यावरती


समोर येतो
अकस्मातसा
फुगाच फुटका
मौलिकतेचा
आणि एवढा खुजा मला मी
दिसतो इवला

खुणावताना
ह्या पायाच्या अंगठ्यापाशी

( हळूच तेव्हा तळहातावर घेतो त्याला
कुणासही आकळण्याआधी)

........................................
बैरागी