अशी व्यक्ती कशी आयुष्यभरची बायको बनते? ला उत्तर मिळाले ते असे -
प्रथम तो भेटतो तेव्हा किती उमदा रसिक असतो
जरासे लग्न होते अन फरक त्याच्यात का पडतो?
असा हा जन्मभरचा फक्त नवरोबा कसा बनतो!
"कशी त्याचीतिची जोडी! कशी माझीतुझी जोडी!"
किती असतात सांगाया दिवसभरच्या घडामोडी
असा पळण्यास का बघतो जणू मी घालते बेडी?
असा हा जन्मभरचा ...
इथे मी काय दाखवतेय अन हा पाहतो कोठे!
मला सांगायचे असले तरी हा ऐकतो कोठे?
शरीराने इथे पण हा मनाने राहतो कोठे?
असा हा जन्मभरचा ...
"नव्या माझ्या खमीजाच्या कश्या ह्या मखमली बाह्या!
कशी दिसतेय मी ह्याच्यात! बघ ना, लाडक्या राया"
न ते बघताच म्हणतो - "छान. आता वाढ जेवाया."
असा हा जन्मभरचा ...
- माफी