खोबरं कोथिंबीर चटणी

  • कोथिंबीर - १ जुडी (छोटी)
  • खोबरं - अर्ध्या वाटीचे (खोबऱ्याची वाटी) छोटे तुकडे
  • लसूण - पाकळ्या मोठया असतील तर ४-५ तुकडे
  • लाल व हिरवी मिरची - चवीप्रमाणे
  • मीठ, साखर - चवीप्रमाणे
१५ मिनिटे
७-८ जण

कोथिंबीर स्वच्छ धुवून घेणे.

मिक्सरमधे खोबरं, कोथिंबीर, लाल व हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे), मीठ (चवीप्रमाणे), साखर (अर्धा चमचा) हे सर्व वाटून घ्यावे.

चटणी तयार

चटणी जास्त तिखट वाटली तर किंचित दूध घालून परत मिश्रण वाटावे.

किंवा

ही चटणी दह्यामधे मिक्स करावी.

डोसा किंवा इडली बरोबर छान लागते

आई