इंग्लंडला येऊन ४ महीने झालेत. आठ वर्षाची गुडीया सोडून.. तीन वर्षाचा क्षितिज सोडून.. फोनवर मलाच सांगतो ` पप्पांचा फोन आला होता..` त्याला समजवताना दमछाक होते. हृदय तिळतीळ तुटतं... कशासाठी सगळं सोडून आलो ?? फक्त पेश्यासाठी ??? माहीत नाही ...
पण मनात येतं ... मी काही एकटाच या दुनियेत नाही. आमचे जवान नाही का वर्ष वर्ष ड्युटी करत ?? मग बळं येतं ... फावल्या वेळात `मनोगत` असतं... इथल्या सगळ्यांचे आभार ....
(बरंच लिहायचंय पण टायपिंगला खूप वेळ लागतो ना ... म्हणून थोडक्यात उरकतो....)