आपले आजी-आजोबा आहेत का हो?

मंडळी, प्रश्न वाचून दचकलात ना ? मी ही हाच प्रश्न CNN वरील डॉ‌. संजय गुप्ता याच्या एका कार्यक्रमात विचारलेला पाहुन असाच दचकलो. आपले उत्तर "होय" असेल तर आपण नशीबवान आहात. घरात दिर्घायुष्य असलेले कोणी जिवंत असतील तर एका अभ्यासानुसार आपल्या आयुष्याच्या लांबीचे आडाखे मांडता येतात असा निष्कर्ष त्या कार्यक्रमात ऐकावयास मिळाला. आणि कार्यक्रम पहाता मला माझ्या आजीची आठवण झाली(मे ०७ मधे ८४ वयात तिचे देहावसान खाले  ). अं हं अहो मी तिचे चरीत्र वगैरे लिहीत नसुन असे नवनवीन निष्कर्ष कसे अंतर्मुख करायला लावतात याबद्दल वाचकांचे विचार जाणू इच्छितो.

अधिक माहिती: IT कंपनीत कामाला असल्याने जेव्हा परदेशी निघावयास जात असे तेव्हा आजोळी थांबून तिचा आशीर्वाद घेउन पुढे मुंबईला जात असे. तिने एकदा डोक्यावरुन हात फ़िरवुन आशीर्वाद दिला के तिच्या ८०-८२ वर्षाच्या सद-भावना जणु बाह्य जगतातील आव्हानांपासुन जणु संरक्षण देतात असे मला प्रत्येक भेटीत वाटत असे. हा किस्सा मी जेव्हा माझ्या अमेरीकन मित्राला सांगीतला तशी त्याची प्रतीक्रिया अशी " हे छान सांगीतलेस, माझी मोठी मुलगी PG साठी दुसऱ्या शहरात काही वर्षांसाठी पुढल्या आठवड्यात जाणार आहे, तिला आजच तिच्या आजी आजोबांना भेटवून आणतो".

या लेखनाच्या निमीत्ताने आपल्या आजी आजोबांची आठवण करूया.  

असो , मंडळी आपले विचार / प्रतिक्रिया जरूर कळवा ही "विनम्र" विनंती

विनम्र - शशांक