गाण्याच्या भेंड्या - एक आठवण

प्राथमिक शाळेंत असतांना एकदा गाण्याच्या भेंड्या लावण्यांत आल्या. सामना मुले विरुद्ध मुली असा होता. अशा वेळी साधारणपणे एखाद्या गटाने गाणे किंवा कविता म्हंटल्यावर शेवटी 'ळ' च्या किंवा 'ण' च्या बाराखडींतील अक्षर आले तर त्याऐवजी अनुक्रमे 'ल' किंवा 'न' च्या बाराखडींतील अक्षर घेण्याची पद्धत आहे. पण त्यावेळी आमच्या शिक्षकांनी 'ळ' व 'ण' ने सुरू होणाऱ्या दोन स्वरचित आर्या सांगितल्याचे आठवते. 

१) 'ळी' हे शेवटी ज्याच्या 'व' मध्ये 'ग' तसाच पहिल्याने
       पाणी दुधांत मिसळुनि विकीत असतो महाग भावाने

२) 'ण' हे शेवटी ज्याच्या 'व' मध्ये 'रा' तसाच पहिल्याने
       वधिले ज्याने त्याला नमितो त्यासी प्रसन्न चित्ताने