घरकर्ज

मी घरासाठी कर्ज घेण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मी काही बँकांकडे चौकशी केली.
बँक ऑफ इंडिया चा व्याजदर कमी आहे.. पण त्या बँकेचा अनुभव असलेला मला कोणीही भेटला नाही. तुमच्या पैकी वा तुमच्या मित्र-मैत्रिणीपैकी कोणी बँक ऑफ इंडिया कडून घरकर्ज घेतले आहे का? त्या बँकेचे अनुभवही नेटवर मिळाले नाहीत.

बँक ऑफ इंडिया आणी बाकीच्या बँकांचा PLR वेगळा असल्यामुळे त्यांचे व्याजदर वेगळे आहेत. उदाहरणार्थ HDFC :१४% आणी BOI :१३.२५% . हा PLR कसा ठरवतात? HDFC आणी BOI मधला हा ०.७५% चा फरक भविष्यात PLR बदलला तरी सारखा राहील का?