माझा आवडता पक्षी - कोंबडी [:]

आवडत्या प्राणी/पक्ष्यावरचा निबंध हा नावडत्या प्राणी/पक्ष्यावर अन्याय आहे आसे मनेका गांधी ला वाटते.

मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.

कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.

कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.

कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो.

कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पन ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो.

कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे.

पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना कोंबडीचोर म्हनत. चोरी करणे चूक आहे.

कोंबदी अंडे देते. ते बहूपयोगी आहे. "आओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा" या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गण्यात मोनीका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देतात का?

अंडे संडे या मंडे खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो.

कोंबडीचा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. कोंबदीला पळत जाऊन पकडने माणसाला हुशार बनवते.

पुर्वी कोंबडा आरवायचा. कोंबडी झोपुन असायची.