कोल्हापुरी मिसळ ...

  • १ कप मटकी , २-३ कांदे, कोथिंबीर,लिंबु
  • तिखट, मीठ - चवीनुसार
  • तेल - १/३ कप
१५ मिनिटे
४-५ जणांना

१ कप मटकी पाण्यात एक रात्र भिजवावी. नंतर कपड्यात बांधून चांगले मोड येऊ द्यावे. मोड आलेल्या मटकीची नेहमी करतो तशी उसळ करून घ्यावी (फोडणी मध्ये मटकी घालून त्यात काळा मसाला,मीठ व थोडे तिखट घालावे)

कोल्हापुरी मिसळीमध्ये कट हा अविभाज्य घटक आहे.

कट करण्यासाठी   कांदे,कोथिंबीर बारीक कापून घ्यावे..एका भांड्यात १/३ कप तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात कांदे घालावे. कांदे चांगले परतल्यावर त्यात चवीनुसार तिखट घालावे. आता त्यात पाणी घालावे. (साधारण तेला चा तवंग दिसेल एवढे)

मिसळ थोडी व कट एकत्र करून त्यावर शेव,कचा कांदा,लिंबू,कोथिंबीर घालून ब्रेड बरोबर खा!!

चटकदार चमचमीत कोल्हापुरी मिसळ तयार!!

 वर दही सुद्धा घालून खातात.

स्वतः