दासबोध व मनाचे श्लोक

समर्थ रामदासस्वामींचा दासबोध व मनाचे श्लोक येथे पहा.

दासबोध हा ग्रंथ काही लोक आध्यात्मिक भावनेने वाचतात, काही साहित्य म्हणूनही वाचतात.  माणसाने कसे असावे, कसे असू नये, कसा विचार करावा, कसे वागावे, कसे वागू नये, शारीरिक-वैचारिक-भावनिक सक्षमता, समाजात कसे रहावे, यांसारख्या अनेक गोष्टींचा उहापोह या ग्रंथात केला आहे. तो ज्या काळात लिहिला गेला त्या काळाचा संदर्भ आणि आध्यात्मिक संदर्भ जरी वजा केला तरी आजच्या काळात सुद्धा तो उपयुक्त वाटतो.

उत्तम लक्षण, मूर्ख लक्षण, कुविद्या लक्षण, पढतमूर्ख लक्षण, रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण, सत्त्वग़ुण लक्षण हे समास वाचण्यासारखे आहेत. मी संपूर्ण ग्रंथ वाचलेला नाही. कोणी वाचलेला असल्यास अधिक प्रकाश टाकावा.