वाचादोष

मनोगतवर नवीनच सदसत्व असल्याने चु.भु.द्या.घ्या. माझी मुलगी १० वर्षाची आहे. बोलताना नेहमीच नाही पण कधी कधी अडखळते. मी स्वत: निरीक्षण केले असता असे जाणवले की  ट, त, क, आणि प ह्या अक्षरांच्या उच्चारावरच ती अडखळते आणि तेही अति उत्साहात काही सांगत असल्यास, बाकी इतर वेळी तेही उच्चार ठीक असतात. ३ वर्षाची होई तोवर तीला बोलताही येत नव्हते. अभ्यासात ती मागे नाही. बरे कुटुंबात कोणालाही हा त्रास नाही त्यामुळे अनुवांशिकतेचा आभाव म्हणता येणार नाही. दोन तीन वेळा वाचादोष उपचार (स्पीच थेरेपी ट्रिट्मेंट) झाले  ह्या उपचार पद्धतीत तीच्या जीभेच्या दोन्ही बाजुला बदामाच्या तेलाने मसाज करण्यात आले. ठराविक शब्द बोलुन सराव केला गेला पण हवा तसा फायदा झाला नाही. आयुर्वेदीक उपचाराबाबत म्हणाल तर डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे तीला 'सारस्वतारीष्ट' देत आहोत.

ह्या चर्चेतुन आपल्या पैकी कोणास ह्या विषयी अधिक माहीती असल्यास मला थोडी मदत मिळेल असे वाटले आणि म्हणुनच हा प्रस्ताव.