आठवण आहे साथी...!

आठवण आहे साथी...!


डोळे तुझे ओले, कळजी तुझ्या स्वरांत;


निघालो मी दूर दूर, दूर होणार क्षणात!


एकटा कसा रहाशील..? उत्तर माझ्या ओठी;


एकटा कुठे वेडे, तुझी आठवण आहे साथी...!


 


नभामध्ये चंद्र, सभोवती तारे,


आसवे पाहुन माझी चिंतातुर सारे;


एकटा का रे रडतोस..? उत्तर माझ्या ओठी;


एकटा नव्हे वेड्यांनो, तिची आठवण आहे साथी...!


 


विचार येत रहातात,कविता लिहीत रहातो;


वाचाणारा प्रत्येकजण आश्चर्य्चकित होतो;


एकटा कसे रे इतके लिहीतो..? उत्तर माझ्या ओठी;


एकटा नव्हे वेडयांनो, तिची आठवण आहे साथी...!


 


मध्ये काळ गेला, आता तू दिसलीस;


डोळी पाणि, ओठी प्रश्न; गोंधळुन गेलीस;


अजुनसुध्दा एकटा कसा...?उत्तर माझ्या ओठी;


एकटा कुठे वेडे, तुझी आठवण आहे साथी...!


                                               :-अनिरुध्द.