आत्मपरीक्षण

         आज खूपच उदास उदास वाटत आहे. वीज कार्यालयात उगाचच गेलोत. साला, आपले सगळे बरोबर असून सुद्धा बील काही कमी नाही केले. आपण अधिकारी असल्याचे सांगून सुद्धा काही ही फायदा झाला नाही. सगळे इथून तिथून सारखेच. एवढा मोठा अधिकारी पण बोलायची पण अक्कल नाही. मलाच म्हणत होता की तुम्हीच सील काढले असेल म्हणून. आता मी कशाला काढू ? आणि दुसरे सील आहेच की. रीडींग कमी आली त्याचे कारण घर १५ दिवस बंद होते. पण ऐकायलाच तयार नाही. अपमान झाला. घरमालकांना मोठी आशा होती की आपण गेलो की फरक पडेल. त्यांना काय सांगणार आता? नाही  झाले! छे ! किती वाईट वाटेन त्यांना? नको त्यापेक्षा आपण घरीच उशीरा जाऊ म्हणजे घरमालक झोपलेले असतील. पण ह्या अधिकाऱ्याने बील कमी करायला काय हरकत होती? बदमाश आहेत सगळे. अपमान! अपमान ! अपमान! जिथे तिथे अपमान. एक पण काम मनासारखे होत नाही.साला सिस्टिमच खराब आहे, पण आपण ही त्याच सिस्टिम चा भाग आहोतच की.  आज ऑफिस झाल्यानंतर घरी न जाता कुठे तरी दूर जाऊ. बायपास ला एकांत असेलच. पण बसायला जागा मिळेल का? आणि शिवाय अंधार पण असेल. नको , त्या पेक्षा पार्क मध्येच बसू. पार्क मध्ये थोडा निवांत पण असेल कारण सगळी माणसं देवी चे दर्शन घेण्यासाठी टेकडी वर गेलेली असतात. ठीक तर मग. पण असे का होत असावे ? आपण प्रत्येक ठिकाणी कमी कसे काय पडत आहोत.? आपले नेमके काय चुकत आहे ? खरंच ! नियती ने आपल्यावर ....... जाऊ देत . आपण ह्यावर संध्याकाळीच विचार करू. कागद पेन पण नेऊ. पार्क मध्ये लाइट पण आहेतच की.  अरे हो.. गेस वाल्याला पण फोन पण करायचा आहे.  ठीक आहे तर मग.  आता मेल चेक करू.

        अम्म....तिकडे बसू .. पण नको तिकडे लाइट कमी आहे .. हां इथे ठीक आहे ... चला एक चांगले आहे की आज गर्दी नाही. इथेच बसू. आज खरेच किती बोर झाले?  आजकाल असे का होत आहे ? कोणतेच काम होत नाही. अरे ! ही दोन माणसे इथे कशाला कडमडायला आले. हुश्श ~~ गेले एकदाचे.

"कृपया!  वेळे अभावी एकदाच लिहू शकत नाही. बाकीचा पार्ट नंतर लिहीन ."