..................................................................................
...निळसर झाले अंग ! नंतर हे आणखी एक राधा-गीत !
..................................................................................
`सावळी कशाने झाली राधा गोरी ?`
..................................................................................
`सावळी कशाने झाली राधा गोरी ? `
सांगेलच ती ! का करायची बळजोरी ?
ही काय हरीच्या अंगचटीला आली ?
ही कशी एवढी लाज कोळुनी प्याली ?
भेटते हरीला साऱयांच्याच समोरी !
ही धीट केवढी... रंग हरीचा मागे !
ही वाया गेली ! मनाप्रमाणे वागे !
लाभे न रंग तर करीन म्हणते चोरी !
गोकुळात चर्चा हिचीच आता चाले -
`या खुळीस आता काय, कसे हे झाले ?
ही जडली बाधा हिला कुठून अघोरी ?`
ही तरी लपवते जगापासुनी काही....
सांगते सख्यांना, `तसले काही नाही !`
- मग कशास होते उगीच गोरीमोरी ?
* * *
ही रंग न मागे, अंगचटी नच येई
ही नाव हरीचे अविरत, अविचल घेई
...त्यामुळेच बनली राधा नंदकिशोरी !
* * *
...सावळी अशी ही झाली राधा गोरी !!
रचनाकाल ः ७ सप्टेंबर २००५
- प्रदीप कुलकर्णी